थोडक्यात
मविआ, मनसे आज पुन्हा निवडणूक आयोगाची भेट घेणार
शरद पवार आज विरोधकांच्या शिष्टमंडळासोबत जाणार नाही
शरद पवार आज पूर्वनियोजित कार्यक्रमानिमित्त पुण्याला जाणार
(Sharad Pawar) मविआ, मनसे आज पुन्हा निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत. काल अपूर्ण राहिलेली चर्चा आज करणार पूर्ण करण्यासाठी मविआ, मनसे आज पुन्हा भेट घेणार असून भेट घेतल्यानंतर महाविकास आघाडी आणि मनसेची एकत्रित पत्रकार परिषद होणार आहे.
विरोधकांच्या प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी आयोगाने वेळ मागितला असल्याची माहिती मिळत आहे.राज ठाकरे पहिल्यांदाच आज मविआसोबत पत्रकार परिषद घेणार आहेत. काल विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिलं. मविआसह मनसेच्या शिष्टमंडळाने निवेदन देताना मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना अनेक प्रश्न विचारले.
आज पुन्हा निवडणूक आयोगाला भेटणार आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळासोबत बैठकीला जाणार नसल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार आज त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानिमित्त पुण्याला जाणार असून थोड्याच वेळात शरद पवार पुण्याला जाण्यासाठी रवाना होणार आहेत. आज होणाऱ्या महाविकास आघाडी आणि मनसेच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.