मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या परिस्थिती संदर्भात जनतेला संबोधन केले. जनतेशी संवाद साधताना त्यांनी लॉकडाऊनसंदर्भात पुढील दोन दिवसांत महत्वाचा निर्णय घेणार असल्याची माहिती दिली. तसेच राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
त्यामुळे लॉकडाऊन अद्याप टळलेला नाही, असा सूचक इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. सध्या राज्यभरात दिवसाला एक लाख ८२ हजार कोरोना चाचण्या होत असून यामध्ये ७० टक्के आरटीपीसीआर चाचण्या असल्याचे सांगितले.
लॉकडाऊन हा घातक आहे. मात्र, आपण कात्रीत सापडलो आहोत, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत लॉकडाऊनसंदर्भातील महत्वाचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उद्यापासून राज्यात आणखी कडक निर्बंध लावणार असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.