uddhav thackeray Team Lokshahi
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : सभेआधी औरंगाबादकरांसाठी राज्य सरकारकडून खैरात

नागरिकांना मुख्यमंत्र्यांच्या सभेचा मोठा फायदा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

औरंगाबाद : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज औरंगाबाद (Aurangabad) येथे सभा होणार आहे. यासाठी शिवसेनेकडून (Shivsena) जंगी तयारी करण्यात आली असून तगडा पोलीस बंदोबस्त असणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्याच्या सभेआधी औरंगाबादकरांसाठी घोषणांची राज्य सरकारकडून घोषणांची खैरात देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना मुख्यमंत्र्यांच्या सभेचा मोठा फायदा झाला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या आधीच 50 टक्के पाणीपट्टी माफीला अखेर मनपाची मंजुरी मिळाली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जलआक्रोश मोर्चाची हवा काढण्यासाठी करमाफी केली आहे. यासंदर्भात महानगरपालिका प्रशासकांनी परिपत्रक जारी केले आहे.

याशिवाय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेआधी औरंगाबादसाठी 207 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शहरातील 224 रस्त्यांसाठी 207 कोटी रुपये मंजूर केले. 524 कोटी रुपये एकूण रस्त्याचा खर्च होणार आहे. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी ही घोषणा केली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला काही तासच शिल्लक असतानाच केला शिवसेनेने पाचवा टीझर प्रदर्शित केला आहे. या टीझरमध्ये विकास मुद्द्यांना महत्व दिलेले दिसत आहे. काय असेल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला केंद्रबिंदू ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. तर,मुख्यमंत्री सभेत औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर घोषणा करण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा