थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Uddhav Thackeray) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागलेले पाहायला मिळत आहे. अनेक बैठका, मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज ज्येष्ठ शिवसैनिकांचा मेळावा पार पडणार आहे.
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज ज्येष्ठ शिवसैनिकांचा मेळावा संध्याकाळी 6 वाजता दादरच्या छत्रपती शिवाजी मंदिरात होणार आहे. 'ज्येष्ठ शिवसैनिक कक्ष' द्वितीय वर्धापन दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम असणार असून या मेळाव्यातून उद्धव ठाकरे करणार ज्येष्ठ शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहे.
या ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यातून उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. उद्धव ठाकरे कोणते मुद्दे मांडतील याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा महत्त्वाचा मानला जात आहे.
Summery
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ज्येष्ठ शिवसैनिकांचा मेळावा
संध्याकाळी 6 वाजता दादरच्या शिवाजी मंदिरात मेळावा
उद्धव ठाकरे आज करणार ज्येष्ठ शिवसैनिकांना मार्गदर्शन