महाराष्ट्र

Satara District Bank Election | खा.उदयनराजे आणि आ. शिवेंद्रराजे यांची बिनविरोध निवड

Published by : Lokshahi News

प्रशांत जगताप, सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व उमेदवारांनी माघार घेतल्यानं उदयनराजे भोसले यांची बिनविरोध निवड झालीय.तर, शिवेंद्रराजे भोसले यांची देखील बिनविरोध निवड झाली आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मोठी घडामोड झालीय. राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसमावेशक पॅनेलमध्ये घेण्यात आलं आहे. उदयनराजे भोसले यांची गृहनिर्माण व दुग्ध विकास संस्था गटातून बिनविरोध निवड झालीय. जिल्हा बँकेचे चेअरमन शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा उदयनराजे यांच्या जागेला विरोध असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, अर्ज माघारी घेण्याची दिवशी सर्व उमेदवारांनी माघार घेतल्यानं उदयनराजे भोसले यांची बिनविरोध निवड झालीय.तर, शिवेंद्रराजे भोसले यांची देखील बिनविरोध निवड झाली आहे.

आज 3 वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत असून खासदार उदयनराजे यांची आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची बिनविरोध निवड झाल्याने राजे समर्थकांनी खासदार उदयराजेंचा जयजयकार करत फटाके वाजवून आनंद साजरा केला. कराड आणि खटाव येथे समाधानकारक तोडगा न निघाल्याने या लढती होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raigad : रायगडमध्ये समुद्रात संशयास्पद बोट आढळली; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

Navi Mumbai : नवी मुंबईतील तुर्भेच्या गोडाऊनला भीषण आग

Latest Marathi News Update live : हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक बंद

Harbour Line : हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक बंद