थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Angar Nagar Panchayat) निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या अनगर नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार उज्वला थेटे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. उज्वला थिटे यांच्या अर्जाला सूचकाची सही नसल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
21 तारखेपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. यामध्ये अनगर नगराध्यक्षपदासाठी भाजपतर्फे राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील आणि अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे हे दोन अर्ज वैध ठरले आहेत. उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसल्याचे आक्षेप ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी थिटे यांचा अर्ज अवैध ठरवला आहे.
याच पार्श्वभूमीवर अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादी अजितदादा गटाचा अर्ज बाद झाल्यावर भाजपच्या राजन पाटील समर्थकांकडून जल्लोष करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. राजन पाटलांच्या मुलाने थेट अजित पवारांना चॅलेंज दिलं असून अजित पवार कोणाचा पण नाद करा पण अनगरकरांचा नाही असं त्यांनी म्हटले.
भाजपच्या राजन पाटील आणि त्यांचे पुत्र अजिंक्यराणा आणि बाळराजे पाटलांकडून जोरदार जल्लोष करण्यात आला. राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा आज बाद झाला त्यामुळे उर्वरित अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी माघार घेतल्यास भाजप उमेदवार आणि राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील या पहिल्या नगराध्यक्ष बनण्याची शक्यता आहे.
Summery
राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद
राजन पाटलांच्या समर्थकांकडून जल्लोष
अर्ज बाद झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष