थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या अनगर नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार उज्वला थेटे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. उज्वला थिटे यांच्या अर्जाला सूचकाची सही नसल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला.
21 तारखेपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. यामध्ये अनगर नगराध्यक्षपदासाठी भाजपतर्फे राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील आणि अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे हे दोन अर्ज वैध ठरले आहेत. उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसल्याचे आक्षेप ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी थिटे यांचा अर्ज अवैध ठरवला आहे.
या प्रकरणात काल सुनावणी पार पडली असून आज पुन्हा या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. दोन्ही बाजूचा आज युक्तिवाद होणार असल्याची माहिती उज्वला थिटे यांचे वकील दत्तात्रय घोडके यांनी दिली आहे.अनगर नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उज्वला थिटे यांच्या अर्जावर आज सुनावणी होणार असून न्यायालय काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summery
अनगर नगरपंचायत प्रकरणात उज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद प्रकरण
सोलापूरच्या न्यायालयात आज पुन्हा सुनावणी
आज न्यायालय निकाल देण्याची शक्यता