महाराष्ट्र

उल्हासनगर महापालिकेचा अनधिकृत मच्छी मार्केटवर हातोडा

Published by : Lokshahi News

मयुरेश जाधव | उल्हासनगर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज अनधिकृत मच्छी मार्केटवर हातोडा चालवत कारवाई केली. यावेळी रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या अनधिकृत घरेही जमीनदोस्त करण्यात आली.

संजय गांधी नगर भागात महापालिकेच्या राखीव भूखंडावर गेल्या काही वर्षांपासून ही अनधिकृत झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. ही जागा खाली करण्याची सूचना महापालिकेने वारंवार इथल्या रहिवाशांना सुचना दिली होती. मात्र तरी देखील इथले रहिवाशी आपली घरं खाली न करता या ठिकाणी राहत होते. मात्र अखेर उल्हासनगर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जेसीबीच्या साहाय्याने त्यांच्यावर तोडक कारवाई करीत हा भूखंड मोकळा केला. तसेच त्याच जागेच्या बाजूला असलेलं महापालिकेचं वाहन पार्किंगच्या जागेवरही अतिक्रमण झाले होते. त्यावर कारवाई करत जागा ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पालिका अधिकारी प्रियंका राजपूत यांनी दिली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Donald Trump On Ind-Pak War : "एक, दोन नव्हे तर तब्बल इतके विमान..."; भारत-पाकिस्तान संघर्षात ट्रम्प यांचा हस्तक्षेप, 'त्या' वक्तव्यानंतर नवीन वाद निर्माण

Chandrakant Khaire : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खैरेंच्या वक्तव्याची चर्चा; "पुढील गणेशोत्सवापर्यंत आमचं..."

Manoj Jarange Patil : "आम्ही पिढ्यानपिढ्या...त्यामुळे गणेशोत्सवात अडथळा येणार नाही" मनोज जरांगेंच मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी मोठं वक्तव्य

Vaishno Devi Landslide : जम्मू-कश्मीरमध्ये वैष्णोदेवी यात्रामार्गावर भूस्खलन, 31 जणांचा मृत्यू तर अनेक लोक ढिगाऱ्याखाली