महाराष्ट्र

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई, नवी मुंबईच्या दौऱ्यावर

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून अनेक दौरे देखील सुरु आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून अनेक दौरे देखील सुरु आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत असतात.

यातच आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई, नवी मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. दादर येथील स्वामी नारायण मंदिरातील योगी सभागृहात त्यांची बैठक होणार असून मुंबई, नवी मुंबई, ठाणे व कोकणातील आमदार, तसेच पदाधिकाऱ्यांसोबत ते संवाद साधणार आहेत.

मुंबईतील आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांसोबत अमित शाह यांची दुपारी 1.30 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत काय चर्चा होतात हे पाहणं महत्वाचं आहे. त्यानंतर नवी मुंबईतील सिडको ऑडिटोरियम मध्ये सायंकाळी साडेचार वाजता बैठक होणार आहे.

ठाणे व कोकण विभागातील आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांसोबत अमित शाह संवाद साधणार असून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत अमित शाह यांची आज रात्री सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?