महाराष्ट्र

universal travel pass service | आता एका क्लिकवर मिळवा रेल्वे प्रवासासाठी ई-पास

Published by : Lokshahi News

राज्य सरकारने १५ ऑगस्टपासून कोरोना लशींचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवास करता यावा यासाठी ई-पास सेवा सुरू केली आहे. सर्वसामान्यांना ई-पास अगदी सहज उपलब्ध व्हावा यासाठी राज्य सरकारने युनिव्हर्सल ट्रॅव्हेल पास सिस्टम विकसित केली आहे. 'युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास' असे त्याचे नाव असून या पद्धतीमुळे प्रवासासाठी सुलभतेने ई – पास मिळवणे शक्य होणार आहे.

लशीचे दोन डोस घेतलेल्या आणि दुसरा डोस घेऊन १४ दिवस झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे प्रवासासाठी सहज ई-पास उपलब्ध व्हावेत यासाठी राज्य सरकारने https:/ /epassmsdma.mahait.org ur वेबलिंक उपलब्ध केली आहे. ही बेवसाईट सुरू झाली असून याद्वारे सर्वसामान्य ई-पास मिळवू शकणार आहेत. ही वेबलिंक सर्वच ब्राउझर्सवर उघडू शकणार आहे. नागरिकांनी या बेवलिंकवरून ई-पास डाऊनलोड करून आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करायची आहे.

राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचारी आणि नागरिकांना ई – पास देण्यासाठी वेब लिंक यापूर्वीच विकसित केली आहे. याच वेब लिंकचा उपयोग करून आता सर्वसामान्य मुंबईकर नागरिकांना देखील मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवासासाठी ई – पास उपलब्ध होणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि नागरिकांसाठी वापरात असलेल्या वेब लिंकमध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रवासाचा पास देण्याकरता अतिरिक्त सुविधा उपलब्ध केली आहे.

ई – पास मोबाईलमध्ये जतन करून, रेल्वे स्थानकांवर तिकीट खिडकीवर सादर केल्यानंतर नागरिकांना रेल्वे प्रशासनाकडून थेट मासिक प्रवास पास उपलब्ध होईल. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर पुन्हा ऑफलाईन पडताळणीची आवश्यकता राहणार नाही. ज्या नागरिकांनी दोन्ही मात्रा घेतल्या आहेत आणि दुसरा डोस घेऊन किमान १४ दिवस पूर्ण झाले आहेत, ते नागरिक या ई पाससाठी पात्र असतील. जे पात्र नागरिक पाससाठी अर्ज करतील, त्यांचे कोविड लसीकरण पूर्ण झाल्याची (दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण.) पडताळणी या लिंकवर होईल. त्यासाठी वेगळ्या मानवी कार्यवाहीची आवश्यकता राहणार नाही. विशेष म्हणजे दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण न झालेल्या नागरिकांनी अर्ज केला तर त्यांना १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच ई – पास उपलब्ध होईल.

असा मिळवा पास

1. https://epassmsdma. mahait.org ही वेब लिंक उघडावी.

2. Travel Pass for Vaccinated Citizens यावर क्लिक करावे.

3. त्यानंतर आपला कोविड लसीकरणासाठी नोंदवलेलाच मोबाईल क्रमांक नमूद करावा.

4. मोबाईलवर ओटीपी अर्थात एकवेळ वापरासाठीचा पासवर्ड एसएमएस प्राप्त होईल.

5. हा ओटीपी नमूद केल्यानंतर लाभधारकाचे नाव, मोबाईल क्रमांक, लाभधारकाचा संदर्भ क्रमांक इत्यादी तपशील दिसतील.

6. त्यामध्ये 'पास निर्माण करा' (जनरेट पास) या पर्यायावर क्लिक करावे.

7. त्यावर क्लिक करताच अर्जदाराचा तपशील तसेच कोविड लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्याचा दिनांक इत्यादी सर्व तपशील दिसेल.

8. या तपशिलामध्ये सेल्फ इमेज' या पर्यायामध्ये अर्जदाराने स्वत:चे छायाचित्र अपलोड करावे.

9. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील ४८ तासांमध्ये युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास करता एसएमएसद्वारे लिंक प्राप्त होईल.

10. लिंक प्राप्त झाल्यानंतर ई पास मोबाईलमध्ये जतन करून, उपनगरीय रेल्वे स्थानकांवर तिकीट खिडकीवर सादर करावा, त्याआधारे रेल्वे पास प्राप्त करता येईल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ashadhi Ekadashi 2025 : विठ्ठल-रखुमाईच्या शासकीय महापुजेसाठी आज मुख्यमंत्री सपत्नीक पंढरपुरात दाखल होणार; कार्यक्रम ठरला, वाचा सविस्तर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा विजयी मेळावा; ठाकरे बंधू काय बोलणार? साऱ्यांचं लक्ष

Latest Marathi News Update live : मनसे - शिवसेनेचा आज मुंबईत विजयी मेळावा

आजचा सुविचार