Nagpur 
महाराष्ट्र

Nagpur : नागपुरात एका बसवर अज्ञातांकडून हल्ला; हलबा एकता जिंदाबाद अशा घोषणांचा परिसरातून आवाज

नागपुरात एका बसवर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Nagpur) नागपुरात एका बसवर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. यावेळी हलबा एकता जिंदाबाद अशा घोषणांचा परिसरातून आवाज येत होता. नागपूरच्या लकडगंज पोलीस स्टेशन जवळ महानगरपालिकेच्या "आपली बस"वर हातोडीने दोन अज्ञाताने हल्ला केल्याचा दावा बस चालकाने केला आहे.

ही बस वर्धमाननगर वरून लकडगंजच्या दिशेने जात असताना लकडगंज पोलीस स्टेशन पासून काही अंतरावर आलेल्या दोघांनी बसवर आधी समोरच्या काचेवर आणि त्यानंतर बाजूच्या खिडकीच्या काचेवर वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे बस चालक आणि आत मध्ये बसलेले प्रवासी घाबरून गेले.

बस चालकाने लगेच बस साईडला थांबवली आणि प्रवाशांना खाली उतरविले. बस वर हातोडीने हल्ला करणाऱ्यांनी "हलबा एकता जिंदाबाद" अशा आशयाचे पत्र त्या ठिकाणी फेकल्याची माहिती मिळत आहे. मागील 6 दिवसांपासून हलबा समाजाचं आंदोलन सुरू असून या हल्ल्याचा आता अधिक तपास जारी करण्यात आला आहे.

Summery

  • नागपुरात एका बसवर अज्ञातांकडून हल्ला

  • हल्ल्या दरम्यान हलबा एकता जिंदाबाद अशा घोषणांचा परिसरातून आवाज

  • 'हलबा एकता जिंदाबाद' असं पत्र फेकल्याची माहिती

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा