महाराष्ट्र

सिंधुदुर्गमध्ये ख्रिस्ती बांधवांच्या प्रार्थना स्थळांची अज्ञातांकडून तोडफोड

Published by : Lokshahi News

समीर महाडेश्वर, सिंधुदुर्ग | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील ख्रिस्ती बांधवांच्या प्रार्थना स्थळांची अज्ञातांकडून तोडफोड झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते मायकल लोबो यांनी स्थानिक पोलिस तक्रार दाखल केली आहे.

पाच वर्षापूर्वी दोडामार्ग तालुक्यातील तेरवण मेढे रामघाट येथे दोडामार्ग तालुक्यातील पाटणे येथील ख्रिस्ती बांधवांनी एकत्रित येऊन धार्मिक विधीसाठी इमारत उभी करून, तिथे उभ्या करण्यात आलेल्या क्रॉससाठी छप्पर बनविले व बसायला इमारत बांधली होती. गेल्या दोन दिवसापूर्वी कोणी अज्ञात व्यक्तीने इमारतीमध्ये असलेल्या साहित्य खुर्च्या, कपाट, टेबल व क्रॉसची मोठ्या प्रमाणात मोडतोड करण्यात येऊन साहित्याचे नुकसान केले. हे कृत्य करणाऱ्यांना पोलिसांनी योग्य तपास करावा व यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पुढे येत आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते मायकल लोबो यांनी स्थानिक पोलिस तक्रार दाखल केली आहे.

Patanjali: बाबा रामदेव पुन्हा अडचणीत; पतंजलीवर मोठी कारवाई

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस