( Maharashtra Weather )उन्हाचा कडाका वाढला असून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. राज्याच्या अनेक भागांत रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. मराठवाड्याच्या विविध भागांत पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला असून पिकांचे मोठ्या प्रमाणात आता नुकसान होण्याची शक्यता आहे. हिंगोली जिल्ह्यात विजेच्या कडकडाटात जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र चांगलीच धावपळ झाली.
बीड, हिंगोली, लातूर, नांदेड या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तसेच दक्षिण कोकण-गोवा आणि मराठवाडा जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता काल वर्तवण्यात आली होती.