महाराष्ट्र

Wardha: वर्ध्यात अवकाळी पावसाचा तडाखा; संत्रा ,गहू हरभरा पिकाचे नुकसान

कारंजा तालुक्यात विजेचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह गारपीट, मुसळधार पाऊस

Published by : Team Lokshahi

भूपेश बारंगे,वर्धा : होत्याचं नव्हतं झालंय,अन् अवघ्या अर्धा ते पाऊण तास झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी मेटाकुटीस आला. हातातोंडाशी आलेला घास अवघ्या काही तासात झालेल्या अवकाळी पावसाने हिरवल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. हातातोंडाशी आलेल्या शेतपिकांवरून शेतकरी स्वप्न रंगत असताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात शेतातील नुकसान बघता पाणी आल्याशिवाय राहत नाही. जिल्ह्यातील आष्टी व कारंजा तालुक्यातील काही भागात काल सायंकाळी विजेच्या कडकडाट,वादळी वाऱ्यासह ,गारपीट, मुसळधार पाऊस झाला.या पावसात हातातोंडाशी आलेला घास हिरवल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.

कारंजा तालुक्यातील गवंडी, पिपरी, धावसा, येनगाव, मोर्शी, खरसखांडा, हेटीकुंडी, भालेवाडी, जुनापाणी, कारंजा, वाघोडा, नारा, सेलगाव, सावल, लिंगामांडवी, दाभा यासह काही गावात वादळीवाऱ्यासह गारपीट, जोरदार पावसाची बॅटिंग झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाले आहे. सोबतच आष्टी तालुक्यातील साहूर परिसरासह बेलोरा ,खंबरा,अंतोरा या शिवारात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने येथील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

वादळीवाऱ्यासह गारपीट झाल्याने गहू,हरभरा पीक जमिनीवर लोटून जमीनदोस्त झाला.तर संत्रा बागेतील फळ जमिनीवर पडल्याने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरवला आहे. अवकाळी पावसाने 40 ते 50 टक्के संत्रा जमिनीवर पडल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.तातडीने या पिकांचे महसूल विभागाकडून पाहणी करून पंचनामे करण्यात यावे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांनातातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकरी करत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार