महाराष्ट्र

‘युपी झांकी है, अभी महाराष्ट्र बाकी है’ म्हणणाऱ्या भाजपा नेत्यांना शरद पवारांचे प्रत्युत्तर

Published by : left

पाच राज्यातील निवडणूकीच्या निकालात (Assembli Election Result) चार राज्यात भाजपाने (BJP) बाजी मारली आहे. त्यामुळे देशभरात भाजपचा जल्लोष सुरू आहे. त्यात भाजपा नेत्यांनी 'उत्तर प्रदेश झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है' अशा घोषणा दिल्या होत्या. या घोषणांवर प्रतिक्रिया देताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी 'तो महाराष्ट्र भी तैयार है' असे प्रति आव्हान दिले आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पंजाबमध्ये हा जो बदल झाला आहे तो भाजपला अनुकूल नाहीच मात्र हा बदल कॉंग्रेसला (Congress) धक्का देणारा आहे असे स्पष्ट मत शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले आहे. पंजाब असं एक राज्य होतं ज्याठिकाणी कॉंग्रेसची सत्ता होती. तिथे आज अतिशय वेगळं चित्र बघायला मिळत आहे असेही शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

'आप' (Aap) हा अलीकडे तयार झालेला राजकीय पक्ष आहे. त्याने दिल्लीत गेल्या दोन निवडणूकांमध्ये ज्याप्रकारे यश संपादन केले. ज्यापध्दतीने प्रशासन दिले त्याने दिल्लीतील सर्वसामान्यांच्या मनात घर केले आहे. पंजाब हे दिल्लीच्या दृष्टीने.सीमेवरील राज्य आहे. दिल्लीच्या कामाचा परिणाम पंजाबमध्ये 'आप' ला झाला असं स्वच्छ दिसत असल्याचे शरद पवार म्हणालेत. पंजाब सोडला तर बाकीच्या ठिकाणी लोकांनी जे सध्या आहेत त्यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली व भाजपचं राज्य स्थापन झाले आहे असेही शरद पवार यांनी सांगितले.

आज देशात प्रभावशाली पर्याय देण्यासाठी किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर चर्चा होऊ शकते. ही चर्चा लगेचच होईल असे नाही. आता संसदेचे अधिवेशन १४ मार्च पासून सुरू होत आहे. एक महिना सर्व सदस्य दिल्लीत असणार आहेत. पुढची नीती ठरवण्याची पाऊले उचलून लोकशाही मजबूत करण्यासाठी लोकांना सहकार्य करण्यासाठी पुढे आणणे हे कर्तव्य आहे असेही शरद पवार यांनी सांगितले.

भाजपकडून आता 'अभी महाराष्ट्र बाकी है' असे बोलले जात असल्याचा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित केला असता ठिक आहे 'अभी महाराष्ट्र बाकी है, तो महाराष्ट्र भी तैयार है' असा स्पष्ट इशारा शरद पवार यांनी यावेळी देत महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा