थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Dharashiv) धाराशिवमध्ये ऊस उत्पादन वाढीसाठी AI चा वापर करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्र, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि स्थानिक कारखान्याकडून यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.
या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना एसएमएस आणि ॲप द्वारे हवामानाचा अचूक अंदाज समजणार असून पाणी आणि खताच्या वापरा संदर्भातील सूचना मिळणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च वाचणार असून उत्पादन वाढीसाठी देखील मोठी मदत होणार आहे. 250 शेतकऱ्यांच्या शेतात पायलेट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे.
Summary
धाराशिवमध्ये ऊस उत्पादन वाढीसाठी AI चा वापर
250 शेतकऱ्यांच्या शेतात पायलेट प्रोजेक्ट सुरु
10 हवामान केंद्रे 250 सोईल मोईश्चर सेन्सॉरची उभारणी पूर्ण