महाराष्ट्र

Vada Pav: 'मुंबईची शान' असलेल्या वडापावला मिळाला जगप्रसिद्ध सँडविचच्या यादीत 'हा' क्रमांक

Published by : Dhanshree Shintre

भारतात विविध प्रकारचे स्ट्रीट फूड आणि फास्ट फूड प्रसिद्ध आहे. त्यात वडापाव हा मुंबईकरांचा सर्वात आवडता पदार्थ आहे. वडापाव हा शब्द जरी ऐकला तरी तोंडाला पाणी सुटतं. मुंबईची शान असणारा हा वडापाव आता याला जगभरात जागतिक स्थान मिळाले आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक शहरात वडापाव मिळतो. अशातच आता जगभरातील प्रसिद्ध सँडविचेसच्या यादीमध्ये आपल्या मुंबईच्या वडापावने १३ वे स्थान पटकावले आहे. यावर आता पूर्ण जगानेच शिक्कामोर्तब केले आहे. प्रसिद्ध फूड अँड ट्रॅव्हल गाईड Taste Atlas ने सर्वात प्रसिद्ध सँडविचेसची यादी जाहीर केली आहे.

Taste Atlas च्या दाव्यानुसार वडापावची सुरुवात अशोक वैद्य यांनी केली होती. ते १९६० आणि १९७० च्या दशकात मुंबईतील दादर रेल्वे स्थानकांवर वडापाव विकत होते. कमी किंमत आणि रुचकर चव असलेला वडापाव अल्पावधिक लोकप्रिय झाला व आधी महाराष्ट्रासह देशभरात पोहोचला आणि आता जगभरात पोहोचला आहे. TasteAtlas ने ही यादी प्रसिद्ध केली आहे. यात वडापावला ४.३ इतकी रेटिंग मिळाली आहे. त्यामुळे वडापाव हा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. ही मुंबईकरांयाठी आनंदाची बातमी आहे.

हा पदार्थ आजही केवळ दहा ते पंधरा रुपयांना मिळतो. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना परवडतो. मुंबईत दररोज लाखो लोक वडापाव खाऊन उदरनिर्वाह करतात. वेगाने पळणाऱ्या मुंबईत अनेकांचे पोट हे वडापावमुळे भरतं असतं. तसेच आपल्या स्वप्नपूर्ती साठी मुंबईत येणाऱ्या अनेकांची पोटं या वडापावमुळे भरतं.

Bhandara : भंडारा शहरातील खड्यात रांगोळी काढून आंदोलन

Chhagan Bhujbal : अनधिकृत होर्डींग लावणारे भावेश भिडे ठाकरेंच्या जवळचे असल्याचा आरोप, भुजबळांची प्रतिक्रिया

Hoarding Collapse Mumbai: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे पालिका प्रशासनाची अनधिकृत होर्डिंग्सवर धडक कारवाई

Ravindra Dhangekar: आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल! नेमकं कारण काय?

Salman Khan Firing Case: सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; हरियाणामधून सहाव्या आरोपीला अटक