महाराष्ट्र

”वैभव नाईक फुकटे आमदार आहेत”, निलेश राणेंची टीका

Published by : Lokshahi News

शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आज आमदार वैभव नाईक यांनी भाजपच्या पेट्रोल पंपावरून स्वस्तात पेट्रोल वाटपाचा उपक्रम आखला होता. या उपक्रमावरून भाजप-शिवसेनेत मोठा राडा झाला होता. या राड्यावर आता माजी खासदार तथा भाजपचे युवा नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसैनिक म्हणून नाही राणे विरोधावरच वैभव नाईकांची ओळख आहे.राणेच्या विरोधावरच आमदार वैभव नाईकांचे अस्तित्व आहे त्यांना शिवसैनिक म्हणून कोणी ओळखत सुध्दा नाही.ते फुकटे आमदार आहेत.आमच्या कुडाळातील पेट्रोलपंपावर बाहेर राहून पेट्रोल वाटपाची स्कीम राबवत होते.मात्र आमच्या लोकांनी त्यांना हाकलून लावले असा टोला माजी खासदार तथा भाजपचे युवा नेते निलेश राणे यांनी लगावला.

राणे पुढे म्हणाले, खाजगी पंपावर शिवसेनेचा उपक्रम राबवणारे आमदार नाईक हे फुकटे आहेत.अन्य लोकांनी उधारीवर पेट्रोल नाकारल्याने ते आमच्या पंपावर आले होते असा हल्लाबोल राणे यांनी केला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा