वसईत शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आईने अभ्यास कर असं सांगितल्याच्या रागातून 12 वर्षांच्या मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
सदर विद्यार्थी वसई पूर्व नवघर परिसरातील समर्थ रामदास नगर मध्ये कुटुंबासह राहत होता. तो अभ्यास करत नाही या कारणावरुन 5 जुलै रोजी आई मुलाला रागावली. हाच राग मनात ठेवून विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे उघड झाले आहे. मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून माणिकपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.