महाराष्ट्र

वसई-विरार महापालिकेच्या डम्पिंग ग्राउंडमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Published by : Lokshahi News

संदीप गायकवाड | वसईच्या भोयदापाडा येथील डम्पिंग ग्राउंडमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिकेकडे अनेकदा तक्रारी करून सुद्धा पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थनिक रहिवास्यानी केला आहे. डम्पिंग ग्राउंडच्या धुराने हजारो नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर त्याठिकाणी सातीच्या रोगाला बळी पडत भोयदापाडा येथील नागरिकांना आपला उदरनिर्वाह करावा लागत आहे.

वसई-विरार महानगरपालिकेमार्फत शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी पालिका क्षेत्रातील गोखिवरे येथील भोयदापाडा येथे १६ हेक्टर जागेवर वसई-विरार महापालिकेने डम्पिंग ग्राऊंड तयार केले आहे. या ठिकाणी महानगरपालिका हद्दीतील घनकचरा टाकला जातो. सुरुवातीच्या काळात महानगरपालिका क्षेत्रामध्ये कमी प्रमाणात घनकचरा निघत होता, मात्र झपाट्याने वाढलेले नागरिकरण व लोकसंख्या यातून आता मोठ्या प्रमाणात घनकचरा या डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जातो. सद्यस्थितीत दिवसाकाठी ६५० ते ७०० टन इतका कचरा निघत असून या डम्पिंगची क्षमता आता संपत आली आहे. डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने कोणताच प्रकल्प न उभारल्याने कचऱ्याचे ढिगारे तयार होऊ लागले आहेत. या ढिगाऱ्यांमुळे कचरा कुजून रसायन तयार होऊन अचानक आगी लागण्याचे प्रकार घडत आहेत.

वसई पूर्वेच्या भोयदापाडा येथील डम्पिंग ग्राऊंडची समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. शहरातून ओला आणि सुका कचरा विलगीकरण न करता एकत्रच डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यात येत आहे. या कचऱ्याला आगी लागण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांचा कोंडमारा होत आहे. सातीच्या रोगाला तोंड देत स्थनिक नागरिक जगत आहेत.टीबी, दमा, ताप, खोकला, अंगाला खाज सुटणे, आशा अनेक साथीच्या आजाराला नागरिकांना बळी पडाव लागत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा