महाराष्ट्र

शासकीय बनावट कागदपत्रे, शिक्के बनविणारी टोळी गजाआड; तब्बल ५५ इमारती संदर्भात घोटाळा

Published by : Team Lokshahi

विरार: वसई, विरार शहरातील तब्बल ५५ इमारतींच्या वेगवेगळ्या शासकीय कार्यालयातून लागणाऱ्या परवानग्यांचे बनावट कागदपत्रे तसेच परवानग्यांसाठी लागणारे ११५ बनावट शिक्के बनवणाऱ्या पाच आरोपींच्या टोळीला विरार पोलिसांनी गजाआड केले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कागदावर, शिक्के मिळाल्याने वसईत घरे खरेदी करणाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. आरोपीकडून सिडको आणि मनपाचे ११०० लेटरपॅडही हस्तगत केल्याची माहिती आज विरार पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पाचही आरोपींनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी शासनाच्या कोट्यावधी रुपयाचा महसुल बुडविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

विरारच्या कोपरी परिसरात इमारत परवानगीसाठी लागणारी कागदपत्रे, सही, शिक्के, सर्च रिपोर्ट, रेरा नोंदणी या बनावट कागदपत्रांच्या आधारे दोन विंगची रूद्रांश नावाची पाच मजली अनधिकृत इमारत बांधण्यात आली होती. मनपाने निष्काषनाची कारवाई करून सदनिकांना सील लावल्यानंतरही सील तोडुन सदनिका रहिवास करण्यासाठी देऊन मनपाची व सदनिका घेणाऱ्या नागरिकांची फसवणुक केल्याप्रकरणी मनपा सहाय्यक आयुक्त गणेश पाटील यांनी ९ फेब्रुवारीला विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. विरार पोलिसांनी गुन्ह्याचा तपास व चौकशी सुरू केली. पोलिसांनी विरार येथील दोन कार्यालयातून मे. रूद्रांश रियल्टर्स तर्फे विकासक/जमिन मालक दिलीप कैलास बेनवंशी (३१), मे. मयुर इंटरप्रायजेसचा मालक मच्छिन्द्र मारूती व्हनमाने (३७), फिनीक्स कार्पोरेशनचे मालक दिलीप अनंत अडखळे (४०), मे. रूद्रांश रियल्टर्सचे भागीदार प्रशांत मधुकर पाटील (३३) आणि रबर स्टॅम्प बनविणाऱ्या राजेश रामचंद्र नाईक (५४) यांना अटक करण्यात आली.

विरार पोलिसांनी तपासात अटक केलेल्या आरोपीच्या कार्यालयातून वसई विरार परिसरातील ५५ अनाधिकृत इमारती बांधण्यासाठी लागणारे वसई विरार मनपा तसेच त्यापूर्वी अस्तित्वात असलेली सिडको यांचे कार्यालयाचे सीसी, ओसी, ठाणे जिल्हाधिकारी यांचेकडील एन ए परवानगी, वसई दुय्यम निबंधक कार्यालयात सादर केलेले दस्त, तहसिलदार कार्यालय यांचेकडील जागा मालक यांच्या जागा गावठाण असल्याबाबतचे नाहकरत प्रमाणपत्र, सर्च रिपोर्ट तसेच इतर बनावट कागदपत्र त्याचप्रमाणे बांधकाम मंजूरसाठी लागणारे विविध शासकीय कार्यालयाचे एकूण ११५ बनावट शिक्के, रेरा ऍथॉरिटीची दिशाभुल करून रेरा नोंदणी केलेली कागदपत्रे, तसेच बनावट सीसी बनविण्यासाठी लागणारे मनपाचे ६०० लेटरपॅड, सिडकोचे ५०० लेटरहेड, ५५ इमारतींचे बनावट कागदपत्रांच्या फाईल्स, बनावट शिक्के बनवण्यासाठी लागणारी लोखंडी मशीन, बनावट शिक्के बनविण्याची वापर केलेली मशिन हा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

आरोपींना शासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांचा पाठींबा असल्याचा संशय आहे. इमारतींच्या फाईलीतील कागदपत्रे तपासणे सुरू आहेत. कॉम्प्युटरचे हार्डडिस्क रिपोर्टकरिता पाठवलेले आहे. या इमारतीमधील सदनिकांना कर्ज देणाऱ्या बँकांच्या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी करणार आहेत.

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा

"एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो"; शरद पवारांच्या विधानाला संजय राऊतांनी दिलं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले...

Patanjali: बाबा रामदेव पुन्हा अडचणीत; पतंजलीवर मोठी कारवाई