थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Jalgaon) महापालिका निवडणुकीची काल मतमोजणी पार पडली असून निकाल जाहीर झाले. यावेळी अनेक ठिकाणी गोंधळ, वाद झाल्याचे पाहायला मिळाले. यातच जळगावात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख तसेच प्रभाग पाच मधून विजय झालेले उमेदवार विष्णू भंगाळे यांच्या चारचाकी वाहनाची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
विष्णू भंगाळेंच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या असून त्यांच्या निवासस्थानाबाहेर उभ्या असल्या वाहनाची तोडफोड करण्यात आली. अज्ञात व्यक्तीने दगड मारून वाहनाच्या काचा फोडल्याची माहिती समोर आली असून या मागे नेमकं कारण काय हे स्पष्ट झालेले नाही.
Summary
जळगावात विजयी उमेदवाराच्या गाडीची तोडफोड
विष्णू भंगाळेंच्या गाडीच्या काचा फोडल्या
विष्णू भंगाळे शिंदेंच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार