Eknath Khadse team lokshahi
महाराष्ट्र

अखेर एकनाथ खडसेंचा झाला विजय; राष्ट्रवादीनं केला करेक्ट कार्यक्रम

Vidhan Parishad Election Result : राज्यसभेच्या निकालात झालेल्या गोंधळामुळे, या निवडणुकीत नेमका काय गोंधळ होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Maharashtra Legislative Council Elections Results : राज्याचं लक्ष आज विधानपरिषदेच्या निवडणुकीकडे लागलं होतं. आज सकाळी सर्व आमदारांनी मतदानाला सुरुवात केली. त्यानंतर मतदान पार पडलं, मात्र काँग्रेसने लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेतला. या आक्षेपामुळे पुन्हा एकदा अशी शंका निर्माण झाली होती की, आज सुद्धा राज्यसभेप्रमाणे निकालाला उशीर होणार का? मात्र काँग्रेसचा आक्षेप राज्या आणि राष्ट्रीय निवडणूक आयोगानं फेटाळून लावला. त्यामुळे सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर निवडणूक आयोगानं सर्व मतं वैध ठरल्याचं सांगितलं आणि अखेर निकाल जाहीर झाला. या निकालातून एकनाथ खडसे यांचा विजय झाला आहे. तसंत काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे, शिवसेनेचे सचिन आहिर, भाजपच्या उमा खापरे, राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर हे देखील विजयी झाले आहेत. दरम्यान, हा निकाल जाहीर होण्यापूर्वीच एकनाथ खडसे, आमशा पाडवी यांच्या समर्थकांनी बाहेर जल्लोष सुरु केला होता.

एकनाथ खडसे यांनी भाजप सोडल्यापासून त्यांना राष्ट्रवादी नेमकं काय स्थान देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे समर्थकांचं लक्ष हे विधान परिषदेच्या निवडणुकीकडे लक्ष लागून होतं. राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी दिली आणि निवडून सुद्धा आणलं. त्यामुळे राष्ट्रवादीनं एकनाथ खडसे यांना विधानपरिषदेवर पाठवत खडसेंचे विरोधक मानले जाणाऱ्या फडणवीसांना शह दिल्याचं बोललं जातंय. एकूण निकाल काहीही असला तरी या निवडणुकीतला हा पैलू अत्यंत महत्वाचा होता. मात्र दुसरीकडे भाई जगताप यांचा पराभव झाला असून, भाजपने प्रसाद लाड यांना यशस्वीरित्या निवडून आणलं आहे.

भाजपकडून या निवडणुकीसाठी प्रसाद लाड, राम शिंदे, प्रविण दरेकर, उमा खापरे आणि श्रींकात भारती यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. शिवसेनेकडून या निवडणुकीत सचिन आहिर आणि आमशा पाडवी तर काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

राज्यसभेच्या निवडणुकीत पाच जागांसाठी सहा उमेदवार उभे राहिले होते. त्यावेळी भाजपचे तीन, शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी, काँग्रेसचा प्रत्येकी एक असे उमेदवार उभे होते. त्यापेकी भाजपच्या एका उमेदवाराचा पराभव होईल असं म्हटलं जात होतं. मात्र भाजपने आपले तिन्ही उमेदवार निवडून आणत शिवसेनेसह भाजपला धोबीपछाड दिला होता.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा