थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Vijay Wadettiwar) बारामतीमधील माळेगाव नगरपंचायतीच्या पंचवर्षिक निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलता अजित पवार म्हणाले की, "तुम्ही मला मतदान करा मी तुम्हाला कामे करुन देईल. तुम्ही काट मारली तर मी पण निधीत काट मारणार," असं वक्तव्य अजित पवारांनी बारामतीत केलं आहे.
"माळेगावमध्ये बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केला मात्र ते झालं नाही. 18 उमेदवार निवडून द्या, मी बोललेले सगळं करणार. तुम्ही काट मारली की मी पण काट मारणार असे अजित पवार म्हणाले. यावरुन आता विजय वडेट्टीवार यांची अजित पवारांवर टीका केली आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, "मत नाही दिलं तर बघून घेईन. एकेकाला लोळवीन, अशा धमक्या चालल्या आहेत. निधी आता त्यांच्या हातात आहेत ते धमकी देतात. मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा आहे. म्हणून ही सगळी खालची लोकं धमक्या देतात. सगळ्या धमक्या देणं सुरु आहे. निधी देणार नाही, विकास होणार नाही. या सगळ्यामध्ये फेअर निवडणुका होणार का? हा खरा प्रश्न आहे." असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
Summery
बारामतीमधील माळेगाव नगरपंचायतीच्या पंचवर्षिक निवडणुकीची प्रचारसभा झाली.
निधीवरून अजित पवारांची मतदारांना धमकी
विजय वडेट्टीवारांची अजित पवारांवर टीका