मुंबईकरांना लोकल प्रवास कधी सुरू होणार याची चिंता सतावत आहे. मात्र, राज्य सरकार याविषयी अद्याप ठाम भूमिका घेताना दिसत नाही. यासंदर्भात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना प्रवासाची परवानगी देण्याची मागणी वाढत आहे. अशात शुक्रवारी कोरोना टास्क फोर्सच्या बैठकीनंतर सरकार निर्णय घेईल, अशी शक्यता मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलीय.
मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याची मागणी वाढत आहे. सध्या अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींनाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र, सर्वांसाठी लोकल सुरू करण्याची मागणी वाढत आहे. यातच आता लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना लोकलने प्रवास करण्यची मागणी होत आहे. यासंदर्भात राज्य सरकार विचार करत असल्याचे संकेत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.