राज्यात कोरोनाची परिस्थिती भीषण होत चालली आहे. सध्या देशातील 50 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यातच कोरोना लसीचा तुटवडा जाणवू लागल्याने मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद यांसारख्या मोठ्या शहरातील लसीकरण बंद झाले आहे. लसींच्या पुरवठ्यावर राजकारण जोर धरताना दिसतंय. महाविकास आघााडी विरुद्ध केंद्र सरकार असा सामना रंगल्याचे चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. यातच मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उडी घेतली आहे.
"कोरोनाची लस देशा बाहेर जाणे योग्य नाही, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. रेमडेसिवीरचा पुरेसा साठा काळाची गरज असून वाढलेल्या रुग्णसंख्येला नियंत्रणात आणण्यासाठी लस देणे आवश्यक असल्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.