महाराष्ट्र

इस्लामपूरात विकास आघाडी व शिवसेनेच्या नगरसेवकांचा आत्मदहनाचा प्रयत्न

Published by : Lokshahi News

संजय देसाई, सांगली | इस्लामपूर शहरातील प्रलंबित भुयारी गटर योजनेचे काम सुरू झालेच पाहिजे अशी घोषणाबाजी करत विकास आघाडी व शिवसेनेच्या नगरसेवकांनी पालिकेच्या सभेत गोंधळ घालतं आत्मदहनाचा प्रयत्न केला. तसेच सत्ताधारी व विरोधी नगरसेवक एकमेकांस भिडले होते.

इस्लामपूर शहरातील प्रलंबित भुयारी गटर योजनेचे काम सुरू झालेच पाहिजे अशी घोषणाबाजी करत विकास आघाडी व शिवसेनेच्या नगरसेवकांनी पालिकेच्या सभेत गोंधळ घातला. त्याला जशास तसे उत्तर देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनीही प्रति घोषणाबाजी करून दिले. सत्ताधारी व विरोधी नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने सभागृहातील वातावरण चांगलेच तापले.

मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी विषयपत्रिकेत नसलेल्या विषयावर मत मांडणार नसल्याचे सांगताच आक्रमक झालेल्या विकास आघाडी व शिवसेनेच्या नगरसेवकांनी मुख्याधिकार्‍यांच्या व्यासपीठासमोर जावून घोषणाबाजी केली. मुख्याधिकारी केबिनसमोर धरणे आंदोलन करणार्‍या विकास आघाडी व शिवसेनेच्या नगरसेवकांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यावेळी नगरसेवक व पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. इस्लामपूर पोलिसांनी 6 नगरसेवकांवर अटकेची कारवाई केली. विकास आघाडी व शिवसेनेच्या महिला नगरसेविकांनी मुख्याधिकार्‍यांच्या कक्षातील टेबलवर बांगडयांचा आहेर दिला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा