महाराष्ट्र

...तर आज माझी मुलगी जिवंत असती; श्रध्दाच्या वडीलांची भावनिक प्रतिक्रिया

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : आफताबने माझ्या मुलीची निर्घृण हत्या केली आहे. आफताबला कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्याच्या कुटुंबियांच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे. त्याने माझ्या मुलीसोबत केली तशी त्यालाही शिक्षा झाली पाहिजे. त्याला फाशी द्यावी, अशी मागणी श्रध्दा वालकरचे वडील विकास वालकर यांनी केली आहे. श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी आज श्रध्दाचे वडीलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

विकास वालकर यांनी म्हणाले की, जे माझ्या मुलीचे झाले ते कोणाच्याही बाबतीत घडू नये. दिल्लीचे राज्यपाल, दिल्ली पोलिसांचे अधिकारी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आम्हाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. माझा न्यायावर पूर्ण विश्वास आहे. मला न्याय मिळवून देण्यासाठी तुमची मदत हवी आहे. वसई पोलिसांमुळे मला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांनी मदत केली असती तर माझी मुलगी जिवंत राहिली असती, असेही त्यांनी म्हंटले आहे.

माझ्या मुलीच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. यासोबतच १८ वर्षांनंतर व्यक्तीला स्वातंत्रता देण्याबाबतचाही विचार करावा. जेव्हा माझी मुलगी मला सोडून जात होती तेव्हा ती म्हणाली की, मी सज्ञान आहे. यामुळे मी काहीही करू शकलो नाही. काही अॅप्सचा देखील विचार केला पाहिजे. माझ्या मुलीसोबत जे झाले ते चुकीचे झाले. यापुढे असं कोणासोबतच होऊ नये, अशी माझी अपेक्षा आहे.

श्रद्धावर असा काय दबाव होते की तिने तिचे शब्द माझ्याशी शेअर केले नाहीत. मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण, प्रतिसाद मिळाला नाही. 23 सप्टेंबर 2022 रोजी मी पोलिसांना भेटायला गेलो आणि माझी तक्रार 3 ऑक्टोबरला नोंदवण्यात आली. अनेकदा श्रध्दाच्या मैत्रिणींशी बोलायचो, पण काहीच उत्तर मिळेना. आफताबच्या आईकडूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. श्रद्धाच्या मैत्रिणींनी मला कधीच सांगितले नाही की तिचे काय झाले. मला काहीच माहीत नव्हते. 2019 मध्ये, जेव्हा श्रद्धाने पोलिसांकडे तक्रार केली तेव्हा मला माहिती नव्हती किंवा पोलिसांनी मला कोणतीही माहिती दिली नाही, असे विकास वालकर यांनी सांगितले.

2021 च्या मध्यात श्रद्धाशी शेवटचे बोलणे झाले होते. मी विचारले ती कशी आहे. ती म्हणाली- मी ठीक आहे, मी बंगलोरमध्ये राहते. तुम्ही कसे आहेत, माझा भाऊ कसा आहे? एवढंच विचारले. 26 सप्टेंबरला एकदा मी आफताबशी बोललो आणि माझी मुलगी कुठे आहे, असे विचारले. ती कुठे आहे हे मला माहीत नाही, असे आफताबने म्हंटले. यावर तू 3 वर्ष तिच्यासोबत राहिलास, ती तुला सोडून गेली तर तू मला का नाही सांगितलेस. तुमच्यासोबत ती ३ वर्ष राहतीये, मग तुझी जबाबदारी नव्हती का? यावर आफताबने कोणतेही उत्तर दिले नाही, असेही श्रध्दाच्या वडीलांनी सांगितले आहे.

साताऱ्यात देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, " उदयनराजेंनी जी कामे हातात घेतली..."

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण

IPL 2024 : चेन्नई आणि लखनऊ संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर, प्ले ऑफचं स्वप्न भंगलं?

टी-२० वर्ल्डकपआधी भारताच्या अडचणी वाढल्या, कर्णधार रोहित शर्माला दुखापत, 'या' खेळाडूनं दिली मोठी अपडेट

"४ जूनला आमचं सरकार दिल्लीत बसणार म्हणजे बसणार"; रत्नागिरी-चिपळूणमध्ये आदित्य ठाकरेंनी पेटवली 'मशाल'