थोडक्यात
अंबादास दानवे यांच्यावर एक कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्यात आले आहे.
आपतगावचे उपसरपंच आणि संदिपान भुमरे यांचे समर्थक धनंजय भोसले यांनी दानवे यांना नोटीस पाठवली आहे.
पिंपळवाडी पिराची येथील जाहीर सभेत दानवे यांनी विलास भुमरे यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे हा दावा करण्यात आला आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर एक कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा करण्यात आला आहे. आपतगावचे उपसरपंच आणि संदिपान भुमरे यांचे समर्थक धनंजय भोसले यांनी दानवे यांना नोटीस बजावली आहे. पिंपळवाडी पिराची येथील जाहीर सभेत दानवे यांनी विलास भुमरे यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे हा दावा करण्यात आला आहे.
अंबादास दानवे यांनी पिंपळवाडी पिराची येथील जाहीर सभेत विलास भुमरे यांना मारहाण केल्याचा आरोप केला होता. तसेच, १९ नोव्हेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेतही त्यांनी विलास भुमरे यांना मारहाण करणाऱ्यांमध्ये त्यांचेच समर्थक धनंजय भोसले यांचा उल्लेख केला होता. या नोटीसीबाबत अंबादास दानवे यांना विचारले असता, त्यांनी प्रतिक्रिया देत म्हटले, "कोण भोसले?" असा सवाल केला आणि पोलिसांनी चौकशी करावी, कारण चौकशीतच सत्य समोर येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.