महाराष्ट्र

भाजपच्या विनोद तावडे यांची राष्ट्रीय महामंत्री म्हणून नियुक्ती

Published by : Lokshahi News

भाजपनं विनोद तावडे यांना राष्ट्रीय महामंत्री करत असल्याचं जाहीर केलं आहे. भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी आज काही संघटनात्मक नियुक्त्या केल्या आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रासाठी विनोद तावडे यांना राष्ट्रीय महामंत्री जाहीर झालं आहे.

भाजपनं बिहार साठी ऋतुराज सिन्हा, झारखंडसाठी आशा लाकडा यांची राष्ट्रीय मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. पश्चिम बंगालसाठी भारती घोष यांची राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून आणि शहजाद पुनावाला यांची राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून नियुक्ती केली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.

विनोद तावडे यांना राष्ट्रीय महामंत्री करत पुन्हा एकदा बळ देण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातंय. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विनोद तावडे यांची नियुक्ती महत्त्वाची असल्याचं बोललं जातंय.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Indians New Name : मुंबई इंडियन्स संघाबाबत मोठा निर्णय; संघाचे नाव बदलून नवं नाव ठेवणार, 'एमआय...'

Sara Tendulkar : सारा तेंडुलकरने सुरू केली नवी इनिंग! सचिन तेंडुलकरने स्पेशल पोस्टसह दिली माहिती

Swanandi Berde Laxmikant Berde's Daughter : लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक आता व्यावसायिका; 'या' ज्वेलरी ब्रँडची घोषणा

Bail Pola Festival : राज्यात बैलपोळ्याचा उत्सव साजरा, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण