महाराष्ट्र

विरारमध्ये आईच्या मारहाणीत 2 वर्षांच्या मुलीचा मृत्यू, आईवर हत्येचा गुन्हा दाखल

Published by : Lokshahi News

विरार पूर्व फुलपाडा परिसरातील पारिजात आपर्टमेंटमध्ये शनिवारी एका आईने दोन वर्षांच्या मुलीला मारहाण केली. या घटनेत मुलीचा मृत्यू झाला आहे. मुलीच्या शवविच्छेदन अहवालावरून हत्याऱ्या आई विरोधात आज विरार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून तिला अटक केले आहे.

नानसी सोनुकुमार सोनी (वय 02) असे आईच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. तर नेहा सोनुकुमार सोनी (वय 22) असे आईचे नाव आहे. आरोपी महिलेचा पती हा रिक्षाचालक असून, पत्नी गृहिणी आहे. या दाम्पत्याला दोन मुली आहेत. तर आरोपी महिला गरोदर आहे.

शनिवारी दुपारी अडीच च्या सुमारास आईने रागाच्या भरात आपल्या 2 वर्षाच्या नानशी या मुलीला बेदम मारहाण केली. त्यात ती बेशुद्ध झाली होती. पत्नीने याची माहिती पतीला दिल्या नंतर मुलीला तात्काळ उचलून विरार पश्चिम ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरने तिला मृत घोषित केले होते.

यावरून वडिलांच्या तक्रारीवरून प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. आज सोमवार मुलीच्या शवविच्छेदन अहवाल आल्या नंतर तिच्या डोक्यावर, अंगावर अंतर्गत जखमा आढळून आल्याने तिला मारहाण झाले असल्याचे उघड झाले आहे.

विरार पोलिसांनी शवविच्छेदन अहवालावरून तपास करून आई विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून तिला अटक केले असल्याची माहिती विरार चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा