VIRAR POLITICS: MAJOR SETBACK FOR BJP AS OFFICE BEARERS JOIN BAHUJAN VIKAS AGHADI 
महाराष्ट्र

Virar Politics: विरार पूर्वेला भाजपला मोठा धक्का, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा बविआमध्ये पक्षप्रवेश

Bahujan Vikas Aghadi: विरार पूर्वेत भाजपला मोठा राजकीय धक्का बसला असून, तिकीट नाकारल्याने नाराज असलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला.

Published by : Dhanshree Shintre

विरार पूर्व येथे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी तिकीट न मिळाल्याने आणि पक्षाकडून दुर्लक्ष झाल्याने नाराजी व्यक्त करत बहुजन विकास आघाडीचा झेंडा हाती घेतला आहे. शुक्रवारी विरार पूर्वेतील भाजपा पदाधिकारी नानू सुभाष आणि मिलिंद वैद्य यांच्यासह त्यांच्या पत्नींनी बहुजन विकास आघाडीच्या कार्यालयात उपस्थित राहून औपचारिक पक्षप्रवेश केला.

त्यांच्यासोबत फुलपाड्यातील शेकडो कार्यकर्त्यांनीही एकत्रितपणे पक्षप्रवेश केला असून, येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाकडून सतत दुर्लक्ष होत असल्याने आणि अनेक वर्षे समर्पित काम केल्यावरही तिकीट वाटपाच्या वेळी वगळण्यात आल्यामुळे ही नाराजी वाढली होती, असे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपमध्ये बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची इनकमिंग सुरू असताना, भाजपात राहून त्यांच्यासाठी काम करण्यापेक्षा थेट बहुजन विकास आघाडीत येऊन प्रत्यक्ष काम करणे श्रेयस्कर ठरेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा