विश्वास नांगरे पाटील सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. यातच आता गृहमंत्रालयाच्या आदेशापुर्वीच विश्वास नांगरे पाटील पुण्याचे नवे आयुक्त असल्याचे स्टेटस पाहायला मिळत आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने हा स्टेटस ठेवला आहे. त्यामुळे आता चर्चा रंगल्या आहेत. "बॉस लवकरच पुण्यात?" असा मजकूर लिहीत नांगरे पाटील यांचा फोटो लावून केलेल्या स्टेटस ची पुण्यासह राज्यभरातील आयपीएस आणि वरीष्ठ अधिकारी यांच्यात चर्चा रंगली आहे.
त्यामुळे आता विश्वास नांगरे पाटील पुण्याचे नवे आयुक्त होणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. गृहमंत्रालयाच्या आदेशापुर्वीच विश्वास नांगरे पाटील पुण्याचे नवे आयुक्त असल्याचे स्टेटस दिसून येत आहे.