Bihar Election 2025 
महाराष्ट्र

Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान; 18 जिल्ह्यातील 121 जागांसाठी होणार मतदान

18 जिल्ह्यातील 121 जागांसाठी होणार मतदान

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • बिहारमध्ये आज पहिल्या टप्प्याकरता मतदान

  • 18 जिल्ह्यातील 121 जागांसाठी होणार मतदान

  • तेजस्वी यादव , सम्राट चौधरी, खेसारीसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

(Bihar Election 2025) बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचे मतदान आज होणार आहे. आज राज्यातील 121 जागांवर मतदान होणार असून संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील NDA आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन यांच्यात मुख्य लढत होणार आहे.

पहिल्या टप्प्यात ४५,३४१ मतदान केंद्रांवर ३.७५ कोटी मतदार मतदान करणार असल्याची माहिती मिळत असून या टप्प्यात एकूण १३१४ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात ११९२ पुरुष व १२२ महिला आहेत. तेजस्वी यादव , सम्राट चौधरी, खेसारीसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

त्यामुळे बिहारच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. 243 जागांच्या विधानसभेतील उर्वरित 122 जागांसाठी 11 नोव्हेंबर मतदान होणार असून 14 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. मतमोजणीला सकाळपासून सुरुवात झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा