महाराष्ट्र

गोरेगाव फिल्म सिटीमध्ये कोसळली भिंत; 2 जणांचा जागेवरच मृत्यू तर 1 कामगार

मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील फिल्म सिटी परिसरात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.

Published by : Dhanshree Shintre

मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील फिल्म सिटी परिसरात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 2 कामगारांचा जागेवरच मृत्यू झाला असून एक कामगार जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या घटनेत एक जण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सदरील घटना नेमकी कशी घडली? याबाबतची अधिकची माहिती समजू शकली नाही.

मुंबईतील गोरेगाव परिसरात प्राइम फॉक्स प्रॉडक्शनच्या पाठीमागे फिल्म सिटी गेट नंबर 2 जवळ 60 फूट लांब तर 20 फूट उंच भिंत कोसळल्यानं ढिगाऱ्याखाली तीन मजुर अडकले होते. यातील दोन मजुरांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. संबंधित घटना कशी घडली याचा तपास सुरू आहे.

अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाऱ्याखालून तीन जणांना बाहेर काढले आणि तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, यापैकी दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर एका व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे, गोरेगाव फिल्म सिटीत मोठमोठे चित्रपट, टीव्ही मालिकांचं चित्रीकरण सुरू असतं. तिथे अशाप्रकारे भिंत कोसळण्याची घटना घडल्यामुळं कला विश्वात खळबळ उडाली आहे. तर ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकलेले आहे की नाही याचा तपास आणि शोधकार्य अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरू आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : काल एक गद्दार काल बोलला 'जय गुजरात' - उद्धव ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "मराठी शिकणारे शिक्षणमंत्री इंग्रजीमध्ये शिकणारा..." राज ठाकरेंचा नाव न घेता टोला

Raj Thackeray Live : 'जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलंय'; राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Raj-Uddhav Thackeray Family Member Vijayi Melava : सहकुटुंब सहपरिवार..; ठाकरे बंधूंचे कुटुंब एकाच व्यासपीठावर