महाराष्ट्र

वर्ध्यात मनसेला मोठा धक्का; मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष 40 पदाधिकाऱ्यांसोबत राष्ट्रवादीच्या वाटेवर

Published by : Lokshahi News

भूपेश बारंगे, वर्धा | विदर्भात मनसेला मोठा झटका बसला आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे वृत्त समोर आले आहेत. त्यामुळे मनसेला मोठा धक्का मानला जात आहे.

मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले हिंगणघाट तालुक्यातील काही सदस्य,सरपंच आणि पदाधिकारी यांच्यासह 40 पदाधिकाऱ्यांसोबत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहे. उद्या मुंबई मध्ये राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार,प्रदेशध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

अतुल वांदिले हा विदर्भातील ओबीसीचा मोठा चेहरा आहे. हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात त्यांनी मनसे पक्षाकडून निवडणूक लढवली होती. त्यामुळे अतुल वांदिले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास हा मनसेसाठी मोठा धक्का असणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा