थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Beed ) ऊसदर प्रश्नी जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना एक होत आक्रमक पवित्रा घेत आहेत. ऊस दराच्या प्रश्नावरून बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना एकत्र येत आक्रमक पवित्रा घेत असून ऊस दर प्रश्नावर शेतकरी संघटना एकवटल्याचे पाहायला मिळत आहे.
ऊस दरवाढीसाठी चक्काजाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून 24 नोव्हेंबरपासून बेमुदत चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
चक्काजाम आंदोलनात सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे व ऊसतोडी बंद ठेवून ऊसतोड व वाहतूक बांधवांनी सहकार्य करण्याचे व संभाव्य नुकसान टाळण्याचे आवाहन ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या वतीने करण्यात आले आहे. जोपर्यंत प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत बेमुदत चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
बीडमध्ये ऊस दर प्रश्नावर शेतकरी संघटना एकवटल्या
ऊस दरवाढीसाठी चक्काजाम आंदोलनाचा इशारा
ऊसाला 4 हजार रुपये भाव देण्याची मागणी