थोडक्यात
महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे
राज्यात ३० सप्टेंबरपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा
घाट परिसरात लहान मोठ्या दरडी कोसळण्याची शक्यता
(Maharashtra Weather Update ) मागील काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही दिवसांपासून ढगाळ वातावरणासह पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. यातच आता २७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सर्व जिल्हा प्रशासनांना संभाव्य अतिवृष्टीच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यात ३० सप्टेंबरपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे शहरी पुराच्या धोक्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सतर्क रहावे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सांगण्यात आले आहे.
घाट परिसरात लहान मोठ्या दरडी कोसळण्याची शक्यता असून राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सर्व जिल्हा प्रशासनांना संभाव्य अतिवृष्टीच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या आहेत.