थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Water supply) मुंबईतील काही भागात तीन दिवस पाणी येणार नसल्याची माहिती मिळत आहे. अपरवैतरणा मुख्य जलवाहिनी वळवण्याच्या कामामुळे तीन दिवस पाणीपुरवठा होणार नाही आहे. 20 जानेवारी सकाळी 9 वाजल्यापासून ते 22 जानेवारी पहाटे पाच वाजेपर्यंत हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
दादर, प्रभादेवी, माहीम , अंधेरी पूर्व विक्रोळी, भांडुप, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स , विक्रोळी पश्चिम या भागातील अनेक ठिकाणी पाणी पुरवठा करण्यास अडचण येणार असून मेट्रो 7 अ प्रकल्पासाठी 2 हजार 400 मिलिमीटर व्यासाच्या मध्य वैतरणा मुख्य जलवाहिनीचा भाग वळवण्यात आला असून त्याची जोडणी करायची असल्याने तीन दिवस पाणी येणार नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Summary
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!
मुंबईतील काही भागात 3 दिवस पाणी नाही
20 जानेवारीपासून ते 22 जानेवारीपर्यंत पाणी पुरवठा बंद