थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Eknath Shinde) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक सभा, बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर काल पालघरमध्ये एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली.
या सभेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "पालघरच्या कॉमन मॅनला सुपर मॅन बनवायचा आहे, आपल्य़ाला विकासाच्या माध्यमातून सुपरमॅन बनवायचं आहे. त्याचं जीवन चांगलं उंचीवर घेऊन जायचं आहे. लाडक्या बहिणींना फक्त लाडकी बहिण योजना देऊन आम्ही थांबणार नाही, त्यांना स्वत:च्या पायावर उभं करणार." असे शिंदे म्हणाले.
Summery
'पालघरच्या कॉमन मॅनला सुपर मॅन बनवायचा आहे'
'पालघरमध्ये विकासाचा भगवा फडकवायचा आहे'
पालघरच्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य