थोडक्यात
शेतकरी कर्जमाफीसंदर्भात आंदोलक प्रतिनिधी शिष्टमंडळसोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
'शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत कर्जमाफी'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
(Devendra Fadnavis ) बच्चू कडू यांच्यासह काही शेतकऱी नेत्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याची काल बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.तसेच या बैठकीत कर्जमाफीच्या मुद्यावर चर्चा झाली.
या बैठकीनंतर 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर सरकारनं समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून ही समिती अभ्यास करुन अहवाल देणार आहे. जी उच्चस्तरीय कमिटी स्थापन करण्यात आली ती समिती 1 एप्रिल पर्यंत अहवाल देईल. असे सांगण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "कर्जमाफीच्या अनुषंगाने एक समिती आम्ही गठीत केली आहे. एप्रिलपर्यंत या समितीने शिफारस करायची आहेत. त्या आधारावर पुढची प्रक्रिया करून तीन महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्यात येईल" असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर सरकारनं हा निर्णय घेतला आहे.