महाराष्ट्र

हवामान विभागाने दिली गुडन्यूज; 'या' तारखेपासून राज्यात पाऊस पुन्हा जोर धरणार

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : राज्यात जून महिन्याच्या शेवटी मान्सून दाखल झाला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून पावसाने विविध भागात दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. अशातच, हवामान विभागाने गुडन्यूज दिली आहे. 16 जुलैपासून राज्यात पाऊस पुन्हा बरसणार आहे. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

दडी मारलेला पाऊस १६ तारखेपासून राज्यात पुन्हा बरसणार आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोकण वगळता अनेक जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली होती. मात्र, येत्या रविवारपासून पाऊस पुन्हा सक्रिय होईल, अशी माहिती पुणे वेधशाळेने आज दिली आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात रविवारपासून पाऊस जोर धरेल आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राज्यात सरासरी पाऊस राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...