महाराष्ट्र

बेळगाव जिल्ह्यासह सीमेवरील आठ जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन; प्रवेशासाठी RT PCR रिपोर्टची मागणी

Published by : Lokshahi News

नंदकिशोर गावडे । बेळगांव जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन कर्नाटक सरकारने जाहीर केला आहे. त्यामुळे आजपासून पुढील दोन दिवस बेळगांव पूर्णपणे बंद राहणार आहे. आता काही तासातच विकेंड लॉकडाऊनला सुरुवात होणार आहे.

कर्नाटक राज्यात कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन सरकारने नाईट कर्फ्यू लागू केलेला आहे..रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असणार आहे . यावेळेत संचारबंदी कलम 144 लागू राहील. तसेच सीमेवरील बेळगाव, बिदर, गुलबर्गा, म्हैसूर, चामराजनगर, दक्षिण कन्नड, कोडगू आणि विजापूर जिल्ह्यात शनिवार आणि रविवार वीकेंड कर्फ्यूची घोषणा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली आहे.

महाराष्ट्र सीमेवरील नाक्यांवर कडक तपासणी

या निर्णयाने महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या बेळगांव जिल्ह्यात कोरोना तपासणीचे निर्बंध कडक केले आहेत. तर सीमेवरील जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन केल्याने कडक अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे आज रात्रीपासूनच बेळगांव जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाला असून आता सोमवारपर्यंत सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.

कर्नाटकात प्रवेश बंद; निगेटीव्ह रिपोर्टची मागणी

आरटीपीसीआर विना कर्नाटकात प्रवेश देऊ नये असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तर 72 तासाच्या आतील कोविड निगेटिव्ह रिपोर्टची मागणी केली जात आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कोरोना रुग्ण वाढल्यास संबंधित जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सीमेवर काटेकोर तपासणी केली जात आहे. लस घेतली असेल तरी सर्वांनाच 72 तासांमधील कोरोना निगेटीव्ह रिपोर्ट मागितला जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...

Raj & Uddhav Thackeray Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Sushil Kedia Apologizes : मराठीबद्दल वादग्रस्त विधानानंतर अखेर सुशील केडियाने मागितली माफी