western railway team lokshahi
महाराष्ट्र

Mumbai Local Issue : पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा सुरळीत!

Published by : Shweta Chavan-Zagade

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईत पश्चिम रेल्वेची (Western Railway) लोकल वाहतूक ( local transport) विस्कळीत झाली आहे. ओव्हरहेड वायर तुटल्यानं पश्चिम रेल्वेचा खोळंबा झाल्याची माहिती मिळत आहे. पश्चिम रेल्वेच्या दहिसर ते बोरीवली रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटली आहे. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या जलद मार्गावरील लोकलवर परिणाम झाला आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून तात्काळ ओव्हरहेड वायर दुरुस्तीचं काम सुरु करण्यात आलं आहे. मात्र आता लोकलची वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती रेल्वेकडून देण्याच आली आहे.

सोमवारी पहाटे साडेपाच वाजता दहिसर ते बोरीवली रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तेव्हापासून कोणतीही लोकल जलद मार्गावरुन चर्चगेटच्या दिशेनं सोडण्यात आलेली नाही. याचाच परिणाम स्लो मार्गावरील वाहतूकीवर झाल्याचंही दिसून येत आहे. कारण जलद मार्गावरील काही गाड्या स्लो मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

दहिसर ते बोरिवली दरम्यान, प्रवाशांची मोठी गर्दी दिसत आहे. त्यासोबतच विरार, वसई, नालासोपारा या स्थानकांतही प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. अद्याप लोकल सेवा पूर्ववत झालेली नाही. लोकल सेवा पूर्ववत करण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना रोजगारात नवीन प्रश्न निर्माण होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी