महाराष्ट्र

नितीन देसाईंच्या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय? लोकशाहीच्या हाती

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Nitin Desai Audio Clip : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याने सिनेसृष्टी पूर्णपणे हादरली आहे. आत्महत्येआधी त्यांनी ऑडिओ क्लीपही त्यांनी रेकॉर्ड केल्या असून एडलवाईज कंपनीमुळे मानसिक त्रास झाल्याचा उल्लेख नितीन देसाई यांनी केला होता. हे ऑडिओ क्लिप आता समोर आल्या आहेत. यामध्ये त्यांनी कशा पध्दतीने त्रास दिला याचे वर्णन केले आहे.

काय आहे नितीन देसाईंच्या शेवटच्या ऑडीओ क्लिपमध्ये?

रशेष शाहा हा गोडबोल्या असून तो छोट्या-मोठ्या उद्योजकांसाठी कष्टानं बनवलेला माझा स्टुडिओ गिळण्याचं काम केलं. 100 फोन केले पण फोन उचलत नाही. 138 इओडब्लू, एनसीएलटी, बीआरटी, यांच्याकडून प्रचंड छळवाद केला. माझ्याकडे दोन तीन इन्व्हेस्टर, गुंतवणूक करण्यासाठी तयार असताना मला सहकार्य केलं नाही. माझ्यावर डबल टिबल किंमतीचा बोजा टाकून प्रेशराईज केले.

स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी माझ्यावर वेगळ्या पद्धतीनं प्रेशर करुन, मी दिलेल्या गोष्टी मान्य करीत नाही. स्मित शाह, केयूर मेहता, आर के बन्सल यांनी माझा स्टुडिओ लुटण्याचा माझी नाचक्की करुन मला घेरण्याचे काम करीत आहे. या लोकांनी माझी वाट लावली आहे. मला पैशाच्या बाबतीत धमक्या देऊन नराधमांनी मला प्रेशराईज केले. सोन्यासारखे असलेले ऑफिस विकायला लावले. एका मराठी कलाकाराला जीवे मारण्याचे काम या नराधमांकडून होत आहे. मला षडयंत्र करुन दडपून टाकून मला संपवले. माझ्या मनात नसतानाही, त्यांनी करायला भाग लावलेले आहे.

दरम्यान, नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खालापूर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फायनान्स कंपनी/ एडलवाईंज ग्रुपचे पदाधिकारी व इतर असे एकूण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नितीन देसाई यांच्या पत्नीने कर्ज वसुलीसाठी छळ केल्याचा आरोप करत तक्रार नोंदवली आहे. यानुसार आता आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम 306, 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला आहे. या गुन्ह्याचा तपास खालापूर विभागाचे पोलीस उपाधीक्षक विक्रम कदम हे करत आहेत.

घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे अजूनही बेपत्ता

पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात अजित पवार गैरहजर

"छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान करेल, त्याला गुडघे टेकायला लावल्याशिवाय राहणार नाही"; नाशिकमध्ये उद्धव ठाकरे कडाडले

"इंडिया आघाडीच्या नादाला लागून उबाठाने पाकिस्तानची हुजरेगिरी केली"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Daily Horoscope 16 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना नोकरी-व्यवसायात मिळणार लाभ; पाहा तुमचे भविष्य