महाराष्ट्र

धक्कादायक! उड्डाणपुलावर स्कूल व्हॅनचे चाक निखळले; थोडक्यात बचावले विद्यार्थी

नागपुरातील धक्कादायक घटना घडली आहे. लहान विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनचे चाक उड्डाणपुलावरून जात असताना अचानक निघाले.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

कल्पना नालस्कर| नागपूर : नागपुरातील धक्कादायक घटना घडली आहे. लहान विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनचे चाक उड्डाणपुलावरून जात असताना अचानक निघाले. त्यानंतर व्हॅन बराच अंतर तशीच एका बाजूने रोडवर घासत गेली. सुदैवाने या घटनेत कोणताही विद्यार्थी जखमी झाला नाही.

नागपूर वर्धा रोडवरील उड्डाण पुलावर आज टाटा मॅजिक व्हॅन मध्ये काही विद्यार्थी शाळेत जात असताना अचानक व्हॅनच्या डाव्या बाजूचा मागचा चाक निघाले. त्यामुळे स्कूल व्हॅन काही अंतरापर्यंत तशीच रोडवर घासत गेली. चालकाच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्याने ब्रेक लावले.

सकाळी 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सकाळची वेळ असल्यामुळे उड्डाण पुलावर जास्त गर्दी नव्हती. यामुळे इतर कुठलेही वाहन या व्हॅनला धडकले नाही आणि मोठी दुर्घटना टळली.

दोन महिन्यांपूर्वी नागपुरातच पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला जमलेल्या पाण्याच्या मोठ्या खड्ड्यात स्कूल व्हॅन पडली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची कमाई वाढण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Aajcha Suvichar : आजचा सुविचार

Pune Ganpati Visarjan 2025 : ढोल-ताशांच्या गजरात पुण्याची विसर्जन मिरवणूक संपन्न

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : 'निरोप घेतो आता आज्ञा असावी..., 33 तासानंतर लालबागच्या राजाचे विसर्जन संपन्न