बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Thackeray Brothers ) महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
मुंबई पालिकेसाठी ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता ठाकरे बंधूंच्या जागावाटपात अजूनही रस्सीखेच सुरूच असल्याने युतीची घोषणा उद्या होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे .
ठाकरे बंधूंकडून माहिम, शिवडी, भांडुपच्या जागेवरून रस्सीखेच सुरूच असल्याची माहिती मिळत आहे. जागवाटपाची चर्चा पूर्ण होईपर्यंत युतीची घोषणा नाही असा पवित्रा असल्याने जागावाटपाचा पेच सुटल्यानंतरच युतीची घोषणा होणार आहे.
Summary
ठाकरे बंधूंमध्ये बैठकांवर बैठका मात्र जागावाटपाचा पेच सुटेना
युतीच्या घोषणेसाठी मुहूर्तही सापडेना
युतीची घोषणा लांबणीवर