महाराष्ट्र

नक्की कोण आहे हा ‘सॅम डिसुझा’?

Published by : Lokshahi News

आर्यन खान कृझ प्रकरणानंतर समीर वानखेडे, प्रभाकर साईल, किरण गोसावी ही नावे चर्चेत आहेत. ड्रग्ज प्रकरणात अडकलेला आर्यन, त्याला अटक करून या प्रकरणाची चौकशी करणारे एनसीबीचे समीर वानखेडे, कॉर्डीला कृझवर धाड टाकताना साक्षीदार असलेले किरण गोसावी आणि गोसावींचे ड्राईव्हर प्रभाकर साईल अशी ही सगळी मंडळी आहेत.

दररोज या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. तर आज, बुधवारी शिवसेनेचे संजय राऊत यांनी सांगितलेल्या एका सॅम डिसोझा बाबत नवीन गोष्ट उघडकीस आली आहे. राऊतांनी ज्या व्यक्तिचा सॅम डिसोझा म्हणून फोटो दाखवला होता, त्या व्यक्तिने पोलीस निरीक्षकांना लिहीलेली तक्रार भाजपाचे संजय भातखळकर यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.


सदर तक्रारदार व्यक्ती या पत्रांतुन आपला फोटो सॅम डिसोझा म्हणून प्रसारीत होत असल्याचे सांगितले आहे. प्रभाकर साईलकडे तक्रारदाराचा फोन नंबर होता ज्यावरून त्यांता जुना डिपी घेऊन तो फोटो डिसोझाचा म्हणून सांगत आहे, असा दावा या तक्रारीतून होत आहे.

दरम्यान या प्रकरणात रोजच नवीन खुलासे होत आहेत. या घटनांचा क्रम राखणं पण कठीण जाईल इतके आरोपप्रत्यारोप दोन्ही बाजूने होत आहेत. नक्की सत्य काय हे जाणून घेण्यात सगळ्यांती उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा