महाराष्ट्र

विरारमध्ये आजारी पतीचे निधन झाल्यानंतर पत्नीने घेतला गळफास

Published by : Lokshahi News

संदिप गायकवाड, प्रतिनिधी

विरारमध्ये पतीच्या निधनानंतर पत्नीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विरार पूर्व मनवेलपाडा गावातील दादू क्लासिक आपर्टमेंटमध्ये हा प्रकार घडला आहे. नरेंद्रसिंग परमार (वय 24) पतीचे नाव आहे. तर, संतोषकुवर नरेंद्रसिंग परमार (वय 22) असे पत्नीचे नाव आहे.

हे दाम्पत्य राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील रहिवासी असून, कामानिमित्त विरारमध्ये राहण्यासाठी आले होते. यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पती आजारी होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मध्यरात्रीच्या सुमारास पतीचा मृत्यू झाल्यानंतर घरात एकटीच असणाऱ्या पत्नीनेही हॉल मध्येच फॅनला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.

आज सकाळी नातेवाईक घरी गेल्यानंतर ही घटना उघड झाली आहे. विरार पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून याचा सखोल तपास सुरू केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup : भारत सरकारची पाकिस्तानच्या हॉकी संघाला आशिया चषकासाठी परवानगी

Pune Crime : पुण्यातील अत्याचार प्रकरणात मोठा खुलासा; Delivery Boy आरोपी हा निघाला तरुणीचा मित्र

Sushil Kedia Post For Raj Thackeray : 'मी मराठी शिकणार नाही...' सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना पोस्ट करत डिवचलं

Ashadhi Wari 2025 : आषाढी एकादशीचा उपवास कधी सोडावा जाणून घ्या...