महाराष्ट्र

वर्ध्यात वन्यप्राण्यांची शिकार

Published by : Lokshahi News

वर्ध्यात वन्यप्राण्यांची शिकार होत असल्याची धक्कादायक माहीती समोर येत आहे. वर्ध्यातील पोहना वनक्षेत्रात 4 ते 5 दिवसापासून वन्यप्राण्याची शिकार होत असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सापळा रचण्यात आला. पोलिसांनी रचलेल्या या सापळ्यात ३ जाणांना अटक करण्यात आली आहे. अजय मेहबूब काळे वय 27 वर्ष,निळकंठ पंजाब पवार वय 28 वर्ष ,अनिल गुलाब पवार अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपींच्या तपासणी नंतर त्यांच्याकडून 9 ससा ,1 तितर, 1 लावा ,असे वन्यप्राणी आढळून आले तर तिघांकडून शिकारीचे साहित्य मिळून आले,तर दुचाकी जप्त करण्यात आली. तर आरोपींना विचारणा केली असता मौजा- मांढरी ,तालुका- वरोरा, जिल्हा चंद्रपूर या परिसरातून हे वन्यप्राणी आणले असल्याची कबुली दिली. या प्रकरणी तिघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम वनगुन्हा दाखल करण्यात आला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा